Pratik Indalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : भारतीय वन सेवा परिक्षा : माणचा सुपुत्र प्रतीक इंदलकर देशात आठवा...

Umesh Bambare-Patil

Dahiwadi News : भारतीय वन सेवा परीक्षेत माण तालुक्यातील उकिर्डे गावचा सुपुत्र प्रतीक प्रकाश इंदलकर याने देशात आठवा क्रमांक मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. या यशाबद्दल प्रतीकचे माण तालुक्यातील प्रशासकीय सेवेत असणाऱ्या सुपुत्रांनी अभिनंदन केले.

प्रतीकचे माध्यमिक शिक्षण नेरुळ, मुंबई Mumbai येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण चेंबूर येथे झाले. २०१७ साली त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यात त्याला काहीवेळा अपयश आले तर काहीवेळा त्यांनी मुलाखतीपर्यंत धडक मारली.

मागीलवेळी अगदी थोडक्यात त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. पण अपयशाने खचून न जाता त्याने प्रयत्नात सातत्य ठेवले. सरतेशेवटी त्याला त्याच्या कष्टाचे, प्रयत्नांचे फळ मिळालेच. प्रतीक इंदलकर याचे वडील प्रकाश इंदलकर हे मंत्रालय मुंबई येथे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

तर प्रतीकची आई राजकुमारी इंदलकर विद्याभवन शाळा मुंबई येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. प्रतीकच्या या यशाबद्दल त्याचे प्रशासकीय सेवेत असणाऱ्या माण तालुक्यातील सुपुत्रांनी अभिनंदन केले. आई-वडीलांचे आशीर्वाद व त्यांनी दिलेले पाठबळ. शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण व अविरत घेतलेले कष्ट यामुळे यशाला गवसणी घालू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रतीक इंदलकर याने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT