Bhagatsinh Koshyari, Shashikant Shinde
Bhagatsinh Koshyari, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav : छत्रपतींचा अपमान करून इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाका....

Umesh Bambare-Patil

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेतील आमदारांसह कामाख्या देवीला निघाले आहेत. त्यातील काही आमदार इतके कर्तृत्ववान आहेत की त्यांना देवी प्रसन्नच होणार नाही. खरेतर बेगडी हिंदुत्व असणारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी आणि इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाकण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील खटाव येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी खटाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे सेनेतील आमदारांसह कामाख्या देवीला निघाले आहेत. त्यातील काही आमदार इतके कर्तृत्ववान आहेत की त्यांना देवी प्रसन्नच होणार नाही.

खरेतर बेगडी हिंदुत्व असणारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी आणि इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाकण्याची गरज आहे. तसेच खटाव ग्रामपंचायतीची सत्ताही अपघाताने मिळालेल्या सत्ताधाऱ्यांनी तिरंगा अपघाताने उलटा फडकवला होता. प्रदीप विधातेंच्या विरोधात सगळे मातब्बर एकत्र लढत आहेत. त्यांनी कितीही ताकद लावली तरी विधाते त्यांना पुरून उरतील. जनता त्यांच्या पाठीमागे आहे. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार सुरु आहे. या मेळाव्याला जमलेली गर्दी पाहता खटावमध्ये पिंपळेश्वर संघटनेचा सूर्य पुन्हा एकदा तेजाने तळपेल, यात शंका नाही.

आमदार शिंदे म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना किंवा माझ्याशी सबंधित तरुण सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वारंवार त्रास देत असतात. खरंतर अतिशय दुर्दैवी आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे झालीच पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु सर्वसामान्यांना याचा कोणताही त्रास होता कामा नये. द्वेषाचे राजकारण करून अनेकांना संपवण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. सर्वसामान्य जनता सुज्ञ असून येणाऱ्या काळात याचे उत्तर परिवर्तनातून नक्कीच देईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT