Hasan Mushrif, Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : "महायुतीतील नेत्यांची काँग्रेसला अंतर्गत मदत...", शक्तीपीठ महामार्गावरून युतीतील वाद चव्हाट्यावर

Shaktipeeth Highway controversy : शक्तीपीठ महामार्ग आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला आहे. तर महायुती मधील आमदारच एकमेकांच्या विरोधात आहेत. शक्तिपीठ आणि हद्दवाढीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 28 Feb : शक्तीपीठ महामार्ग आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला आहे. तर महायुती मधील आमदारच एकमेकांच्या विरोधात आहेत. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) आणि कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीवरून महायुती मधील आमदारांमध्येच असलेल्या मतभेदावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

त्याला काल गुरुवारचा दिवस देखील अपवाद ठरला नाही. एकीकडे महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शक्तिपीठला शेतकऱ्यांचा विरोध तर आपलादेखील विरोध असल्याचा पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

त्याला प्रत्युत्तर म्हणून क्षीरसागर यांनी देखील महायुती मधील नेत्यांकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर महायुती मधील आमदारच आमने-सामने आले आहेत.शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमधील (Kolhapur) शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचं मी आणि आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितल असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

शिवाय कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी ही भूमिका माझी देखील आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि मी लवकरच नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गमुळे महायुतीला (Mahayuti) फटका बसला हे दिसून आले. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आल्यानंतर ही आधी सूचना कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द करण्यात आली. आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाईल असे आपल्याला तरी वाटत नाही. असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिले. मुश्रीफ यांच्या या भूमिकेनंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परिपत्रक काढत महायुतीतील नेत्यांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

शक्तिपीठ महामार्ग हा महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र जिल्ह्यातील काही महायुतीतील नेते हे काँग्रेसला म्हणजे विरोधकांनाच अंतर्गत मदत करत असल्याचा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवाय धुसफूस देखील बाहेर आली आहे. सत्ताधार्‍यांना विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा महायुतीमधील नेतेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने विरोधकांच्या हातात देखील आयते कोलीत मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT