Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आषाढीच्या महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण!

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आषाढी एकादशीच्या (ता. १२ जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. विविध कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. (Invitation to Chief Minister Uddhav Thackeray for Ashadi Ekadashi Mahapuja)

आषाढी एकादशीच्या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चाही केली. पंढरपुरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिर सामितीच्या पदाधिकाऱ्यांना या वेळी दिली.

गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून माहिती विचारून घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबतही चर्चा झाली. निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला. वर्षा शासकीय निवास स्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT