Jayant Patil, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का...शंभूराज देसाई

साताऱ्यात शिवसेनेच्या Shivsena शिंदे गटाची Shinde Group हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेस आजपासून मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai व आमदार अनिल बाबर MLA Anil Babar यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात झाली.

Umesh Bambare-Patil

सातारा : आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केलं आहे. कोणाच्या मनात काय आहे याचे त्यांना नवीन ज्ञान झालेलं दिसत आहे, अशी टीका राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जयंत पाटलांवर केली.

साताऱ्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेस आजपासून सुरवात झाली. त्यावेळी साताऱ्यातील कार्यक्रमानंतर मंत्री देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. शंभूराज देसाई म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांना शिंदे गट शिवसेनेत जाण्यापासून थटवून ठेवण्यासाठी जयंतराव असे वक्तव्य करत आहेत.

शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यासाठी गटाचे सर्व नेत्यांवर चार चार जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. त्या जिल्ह्यांचे दौरे करून आम्ही वातावरण निर्मिती करत आहोत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शंभूराज देसाई म्हणाले, आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केलं आहे. कोणाच्या मनात काय आहे याचे त्यांना नवीन ज्ञान झालेलं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT