Shahaji Patil
Shahaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Shahaji Patil : सरपंच काय कलेक्टर आहे?; गाव भेटीत अनुपस्थित सरपंचावर शहाजीबापू संतापले !

दत्तात्रय खंडागळे

Shahaji Patil News : सांगोला तालुक्यातील अनेक गावांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेट देत तेथील विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी एका गावातील सरपंच अनुपस्थित राहिल्याने पाटील यांना संताप आनावर झाल्याचे पहायला मिळाले.

आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) शिरभावी (ता. सांगोला) येथे दौऱ्यावर होते. त्यावेळी विकास आढावा घेण्यात आला. यावेळी मात्र गावचे संरपंचच उपस्थित नव्हते. त्यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी संताप व्यक्त केला.

ते म्हणाले, "विकासात मी कधीच राजकारण करत नाही. कामासाठी माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आला तरी मी फक्त कामाचा विचार करतो. आज गाव विकासाची, अडीअडचणीची बैठक आहे, मात्र सरपंच अनुपस्थित राहिले. 'सरपंच काय कलेक्टर आहेत काय?" असा सवाल करीत आमदार शहाजी पाटील यांनी शिरभावीत संताप व्यक्त केला.

सांगोला (Sangola) तालुक्यातील हलदहिवडी, शिरभावी, संगेवाडी, मेथवडे, सावे, बामणी, मांजरी या गावांचा आमदार शहाजी पाटील यांनी बुधवारी दौरा केला. त्यांनी 'आमदार आपल्या दारी' (MLA at your door) या उपक्रमा अंतर्गत गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरभावी येथे गावातील अडीअडचणी सांगताना, नागरिक निवेदन देताना सरपंच अनुपस्थित होते. त्यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी संताप अनावर झाला.

यावेळी पाटील म्हणाले, "गावाच्या विकासासाठी कधीच कोणीच पक्षीय राजकारण करू नये. मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नसून मी संपूर्ण तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकासकामे करताना कधीच पक्षपात करत नाही. येथील सरपंच काय कलेक्टर आहे का? आम्ही पक्षपात करत नाही, आपणही कोणी विकासाच्या कामात पक्षपात करू नये. सर्वांनी एकत्र येऊन यापुढे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कामे करूया", असेही शेवटी आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांनी तालुक्याला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, "सांगोल्याची दुष्काळी ओळख मी पुसून टाकणार आहे. तालुक्याच्या विकास कामासाठी निधीची व पिण्याच्या, शेतीच्या अपूर्ण पाणी योजना पूर्ण करणार आहे. त्यामुळे यापुढे तालुक्यात निधीची व पाण्याची कमतरता भासणार नाही", असेही आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी सांगितले.

या गावभेट दौऱ्याच्या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महावितरणचे उपअभियंता आनंदा पवार, गटशिक्षणाधिकारी श्री नाळे इत्यादी नेतेमंडळी, अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT