Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली हे वास्तवच...पृथ्वीराज चव्हाण

त्यामुळे इतिहासातील व्यक्तीरेखांकडे figures of history ब्लॅक-व्हाईट Black White पद्धतीने पाहून त्याचे राजकारण Politics करणे योग्य नाही.

सरकारनामा ब्युरो

कराड : वि. दा. सावकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहेच. मात्र, त्यांनी ब्रिटीश सरकारची माफीही मागितली होती, त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे इतिहास पुरूषाच्या भूमिका त्या त्या काळातील असून त्याचा त्या पातळीवर जावून अभियास करण्याची गरज आहे, असेही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडात व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ऐतिहासिक पुरुषांबद्दल बोलताना ऐतिहासिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बोलले पाहिजे. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत विधान केले, त्याला त्यांनी जुन्या पत्रांचा दाखला दिला होता. त्यांनी विधान केले व ते कोणत्या आधारे केले त्याची पत्रे दाखवली, त्यावेळी तो विषय तेथे संपला.

मात्र त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी समोर आला. कॉग्रेसचे सरकार असताना दिवंगत इंदीरा गांधीनी १९६६ मध्ये सावकर यांचे टपाल तिकीट काढले होते. त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान आहे. मात्र त्यांनी ब्रिटीश सरकारची माफीही मागितली होती, हेही वास्तव आहे. सावरकर यांनी लंडनमध्ये असताना ब्रिटीश सरकार विरोधात भूमिका घेतली. 1857 च्या लढ्याचे पृथ्थःकरण करताना त्यांनी ब्रिटीश विरोधी बंड होते, असे स्पष्ट पुस्तक लिहिले.

त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. पॅरिसमध्ये त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांनी जहाजातून मारलेली उडीपासून त्यांच्या ब्रिटीशांविरोधातील भूमिका महत्वाच्या आहेत. त्यांना वयाच्या 28 व्या वर्षी 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. लहान वयात ती शिक्षा त्यांनी 10 वर्षे भोगली. त्यानंतर मात्र, त्यांनी माफी मागितली. त्यांना रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. त्यांना ब्रिटीशांकडून 30 रूपये मानधन मिळत होते. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास गरजेचा आहे. त्यामुळे इतिहासातील व्यक्तीरेखांकडे ब्लॅक-व्हाईट पद्धतीने पाहून त्याचे राजकारण करणे योग्य नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT