<div class="paragraphs"><p>Udayanraje Bhosale, Sayali Patil</p></div>

Udayanraje Bhosale, Sayali Patil

 

pramod ingale, satara

पश्चिम महाराष्ट्र

कौतुक करावे ते उदयनराजेंनीच... धाडसी सायलीपुढे झाले नतमस्तक...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : बेटी बचाओ..बेटी पढाओ..हा संदेश घेऊन ठाण्यातील दहा वर्षाची सायली पाटील काश्मिर ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासासाठी निघाली आहे. आज ती साताऱ्यात आली त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी तिचे त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी स्वागत केले. तसेच या मोहिमेसाठी तिला सर्वती मदत करण्याचे आश्वासन दिले. सायलीच्या या धाडसाचे उदयनराजेंनी कौतूक केलेच पण तिच्यापुढे नतमस्तक झाले.

ठाण्याची सायली पाटील ही अवघ्या 10 वर्षाची मुलगी बेटी बचाओ...बेटी पढाओ... हा संदेश घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करत आहे. सायली काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण चार हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. तिने आतापर्यंत 2200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अजून 1800 किलोमीटरचा प्रवास शिल्लक आहे. उर्वरित प्रवास येत्या 18 दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे. आज 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली, तेव्हा तिचे साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी सायलीचं स्वागत केले. तसेच या मोहिमेसाठी तिला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. सायलीच्या या धाडसीवृत्तीचं तोंडभरुन कौतुक करत उदयनराजे सायली पुढं नतमस्तक झाले. तसेच पुढील प्रवासासाठी उदयनराजेंनी सायलीला शुभेच्छा दिल्या. तसेच फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT