Bhai Jagtap, Sambhaji Bhide sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad BJP News : भिडेंना भाजपनेच गुरुजी बनवले; त्याला माथेफिरू हा शब्दही सौम्य आहे : भाई जगताप यांची बोचरी टीका

Bhai Jagtap आमदार भाई जगताप हे कराड ( जि. सातारा) दौऱ्यावर असून आज शनिवारी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सकाळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad BJP News : ज्या माणसाला स्वतःचं नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत कसा होवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन भाजपनेच त्यांना गुरुजी बनवले आहे. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे. लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्यावर टीका करणारा हा माणूस. याला माथेफिरू हा शब्दही सौम्य झाला आहे, अशी बोचरी टीका आमदार भाई जगताप यांनी भिडे गुरुजी या नावावरून भाजपवर केली.

सातारा लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीसाठी कॉंग्रेसचे सातारा जिल्हा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार जगताप Bhai Jagtap हे कराड ( जि. सातारा) दौऱ्यावर Karad आले हाोते. त्यादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्या समाधीस्थळी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात , झाकीर पठाण, अजित पाटील- चिखलीकर आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्यावर टीका करणारा हा माणूस. याला माथेफिरू हा शब्दही सौम्य झाला आहे.

ज्या माणसाला स्वतःचं नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत कसा होवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन भाजपनेच त्यांना गुरुजी बनवले आहे. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे, असेही त्यांनी नमुद केले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT