Koregaon News : लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी २०२४ ची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मला सर्वत्र जावे लागते. त्यामुळे मी जावली-कराडला गेलो होतो, परंतु मी कोरेगावमधूनच निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या Koregaon APMC सभागृहात कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत शशिकांत शिंदे Shashikant Shinde बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, माझे दैवत शरद पवार Sharad Pawar साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून कोरेगाव मतदारसंघात उमेदवारी दिली होती.
आज कोरेगावचे आमदार म्हणून केलेल्या विकासकामांची पुन्हा एकदा जनता पोच पावती देणार आहे, याबद्दल माझे दुमत नाही. निष्ठावंत ही ओळख आमच्यासाठी पाठीवर थाप देणारी आहे. लोक सत्ताधाऱ्यांवर नाराज असून, परिवर्तन होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. Maharashtra Political News
सातारा जिल्ह्यातही हेच परिवर्तन पाहण्यास लवकरच मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कर्तव्य भावनेतून मी काम करत आहे. कोरेगाव मतदारसंघात सध्या विविध प्रलोभने दाखवून कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला आहे, त्यांचा पराभव केल्याशिवाय माझे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी २०२४ ची निवडणूक महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मला सर्वत्र जावे लागते. त्यामुळे मी जावली-कराडला गेलो होतो. परंतु मी कोरेगावमधूनच निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याचा निर्धार त्यांनी केला.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.