Jayant Patil 
पश्चिम महाराष्ट्र

बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस पळून आले होते का? : जयंत पाटलांचा उपरोधिक सवाल

Devendra Fadanvis| Jayant Patil| बाबरी मशिद पाडण्यासाठी गेलो असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता

सरकारनामा ब्युरो

सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी १ मे रोजी बुस्टर डोस सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आपण बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलो असल्याचा दावाही केला. फडणवीसांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहे, आमच्या अनेकदा गप्पा रंगल्या. पण त्यांनी कधीही बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे सांगितले नाही. जर ते तिथे गेले होते तर ते कुठे उभे राहिले होते, त्यांना दगड लागला नाही का, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता का, की ते तिथून पळून आले होते, याची माहिती त्यांनी मला सहज गप्पा मारता मारता द्यावी, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टोले लगावले.

फडणवीस यांनी बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडायला मी होतो, असा दावा केला. पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझ्या अनेकदा गप्पा रंगल्या. कधीतरी त्यांनी हे मला सांगायला हवे होते. ही काही छोटी गोष्ट नाही. त्यांनी ते सांगितले नाही म्हणजे ते खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. बाबरी पाडून किती वर्षे झाली? तेव्हा ते २१-२२ वर्षांचे होते, मग लालकृष्ण अडवाणींनी या तरुणाला त्याच्या करिअरची चिंता न करता तिकडे कशासाठी नेले?, पण आता या सगळ्या गप्पांना अर्थ नाही. त्यावेळीच बाळासाहेब ठाकरे यांनी त्या गोष्टीची जबाबदारी घेतली होती. आता कुणी काही दावा करून काही होणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले

- काय म्हणाले होते देवेंद्र फडवीस?

महाराष्ट्राच्या नावाला बंटा लावण्याचे काम तुमच्या सरकारमध्ये होत आहे, असा हल्लाबोल केला. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर तुमची हातभर फाटली, आणि सांगता मशिद पाडली. मी तो ढाच्या पाडण्यासाठी होतो. तुम्ही कुठे होतात. १८ दिवस मी जेलमध्ये होतो. बाबरी पाडली त्यावेळी महाराष्ट्रातील एकही शिवसेनेचा (Shivsena) नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. बाबरी पाडली त्यामध्ये ३२ आरोपी होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणताच शिवसेनेचा नेता नव्हता. आमचा दोष काय आहे तर आम्हला प्रसिद्ध करता येत नाही. ज्या वेळी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तो कारसेवकांनी आणि राम भक्तांनी पाडला, असेही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT