Jayant Patil-Chandrakant Patil Sakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : फडणवीस यांचा आदेश येऊ द्या... जयंत पाटील यांना भाजपमध्ये आणण्यासाठी मी स्वतः जाईल!

Chandrakant Patil's On Jayant Patil's BJP entry : गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. यावरून राज्याचे मुख्यमंत्रीही मध्यंतरी बोलले होते. यानंतर आता सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू होत्या. पण जयश्री पाटील यांच्या प्रवेशाच्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चांना बगल दिली होती. त्यावरून जयंत पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम लागला. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चांना भरती आली असून याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य कारण ठरले आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

फडणवीस यांनी, याआधीच जयंत पाटील यांच्या प्रवेशावर बोलताना जे कुटुंब आमच्याकडे यायचे होते. ते आम्ही आणले. त्या कुटुंबातल्या एका महत्वाच्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याचे सांगितले होते. पण या वक्तव्यामागे जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यातील मैत्रीचा धागा असावा अशी चर्चा सुरू झाली होती.

पण आता जयंत पाटील यांच्या प्रवेशावरून चंद्रकांत पाटील यांनी नव्याने वक्तव्य केलं आहे. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांनी जर सांगितले, तसे त्यांनी आदेश दिले की जयंत पाटील यांना भाजपमध्ये घ्यायचे आहे. तर त्यासाठी मीच पहिल्यांदा जयंत पाटील यांच्याकडे जाईन आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन असे म्हटलं आहे. ते मिरजेत जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिल्यानंतर बोलत होते.

तसेच पाटील म्हणाले, फडणवीस हे एकमेव आमचे नेते आहेत. त्यांचेच आम्ही ऐकतो आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचालही करतो. जर भाजपसाठी जयंत पाटील यांना घेण्याचा निर्णय झालाच. तसेच आदेश किंवा फडणवीस यांनी मनावर घेतले तर मी त्यासाठी प्रयत्न करेन. जयंत पाटलांच्याकडे मीच पहिल्यांदा जाईन आणि तुम्ही भाजपमध्ये आले पाहिजे, असे सांगेन.

पण हे फक्त फडणवीस यांनी निर्णय घेतल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे आम्हीही असे काहीही करत नाही. तर फडणवीसही जयंत पाटील यांच्याबाबत असा निर्णय घेतील असंही वाटतं नाही. फडणवीस यांच्या मनातील कळायला फार मोठे-मोठे राजकारणी थकले आहेत. मी तर सामान्य माणूस असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT