Jayant Patil News : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 61 पैकी त्यांनी 18 जागांवर विजय मिळवला आहे. तर, 16 जागांसह भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. तर, 11 जागांसह काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. महाविकास आघाडीला मतदारांना साथ दिल्याचे दिसून आले. या निकालानंतर जयंत पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांना डिवचले.
फेसबूकवर पोस्ट करत जयंत पाटील म्हणाले आहेत की, 'जिल्ह्यात हुकूमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते, वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात होते. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे.'
पुढे त्यांनी म्हटले आहे की, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही. आपल्या जिल्ह्याची ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनतेचे पुनश्च एकदा आभार!
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने माय बाप जनतेचे आभार व्यक्त करतो, असे देखील त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे 18, काँग्रेसचे ११, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य विजयी झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सदस्य संख्या 30 होते. त्यांना बहुमतासाठी एक सदस्याची गरज आहे. भाजप आणि महायुतीकडे 31 सदस्य आहेत. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे या सदस्यांना आपल्यासोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.