Hasan Mushrif- Jayant Patil News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : नाहीतर, जयंत पाटलांनीही आमच्यासोबत शपथ घेतली असती; हसन मुश्रीफांचा खळबळजनक दावा

Hasan Mushrif- Jayant Patil News : हसन मुश्रीफ यांना भाजपच्या रूपात असलेल्या रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाजवळ पाठवले असल्याचे जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.

Rahul Gadkar

Kolhapur Political News : गेल्या वर्षी इचलकरंजीत रावणाचे दहन करण्यासाठी आलेल्या हसन मुश्रीफ यांना भाजपच्या रूपात असलेल्या रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाजवळ पाठवले आहे. आता आपण सर्वांनी मिळून भाजपरूपी रावणाचे दहन करू, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या टीकेला आज वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी उत्तर दिले.

जयंत पाटील यांच्यासारख्या माणसाने असे वक्तव्य करणे चुकीचे होते. एका घटनेमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती. काही गोष्टी लगेच सांगायच्या नसतात, पण वेळ आली की ती गोष्ट नेमकी काय होती ते मी नक्कीच सांगेन. पण आता आम्ही भूमिका बदलेली आहे. ज्या पक्षासोबत आम्ही गेलो त्या पक्षासोबत प्रामाणिक राहणे हे आमचे कर्तव्य आहे.

याचवेळी त्यांनी मराठा समाजाच्या नागरिकांनी त्यांची गाडी अडवल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मुश्रीफ म्हणाले, मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली, पण मी त्यांना समाधानकारक उत्तर दिले,पण आता शासनपातळीवर आपल्याला हा तिढा सोडवायला हवा. न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. हे चक्रव्ह्यू आपल्याला भेदावेच लागेल.

यासाठी आम्ही मंत्रिमंडळातही समाजाच्या भावना मांडू आणि लवकरात लवकर आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यांनी आंदोलन कसे करावे आणि कसे नाही हा त्यांच्या प्रश्न आहे. त्यात राजकारणही असण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना आरक्षण देणे महत्त्वाचे आहे,असेही मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT