Jayant Patil- Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : पाटील-पडळकर युद्ध तापलं!, पडळकरांच्या टीकेला जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर; म्हणाले, 'हिस्ट्रीशीटर, स्वतःच्या गावातच...'

Gopichand Padalkar Vs Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सोडताना आमदार जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासमोरच सांगली जिल्हा अन् वाळवा तालुका सहजा सहजी झुकत नाही असे म्हटले होते. ज्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली होती.

Aslam Shanedivan

Summary :

  1. सांगली वाळवा तालुक्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

  2. “जयंत पाटील झुकत नाही, थेट पालथाच पडतो” असा पडळकरांनी टोला लगावला.

  3. त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत पडळकरांना ‘हिस्ट्री सिटर’ असे संबोधले.

Sangli News : आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडील प्रदेशाध्यक्ष पद सोडत राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वाळवा तालुका सहजा सहजी झुकत नाही, असेही वक्तव्य केलं होतं. ज्याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला होता. 'जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहेत. ते म्हणतात तसे सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही, जे बरोबर आहे. पण जयंत पाटील हा झुकत नाही, थेट पालथाच पडतोय, अशी जहरी टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून पडळकरांचा उल्लेख हा हिस्ट्रीशीटर असा केला आहे. तसेच अशा हिस्ट्रीशीटरमुळे सभागृहात बोलणेही कठीण झाल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे.

ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. खासदार विशाल पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, सभापती सुजय शिंदे, जिल्हा बँक संचालक मन्सूर खतीब, प्रा. सुकुमार कांबळे, संजय कांबळे, अविनाश वाघमारे उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील यांनी, बऱ्याच चोऱ्या सध्या ऐकण्यात येत आहेत. येत होत्या. आता मत चोरीचा प्रकार ऐकण्यात येत आहे. आता या सरकारकडून कोणत्या अपेक्षा करणं देखील अवघड आहे. राज्याच्या विधानसभा सभागृहात ‘हिस्ट्रीशीटर’ (रेकॉर्डवरील गुन्हेगार) बसायला मिळत असून सभागृहात विचार मांडणेदेखील अवघड झाले आहे, असा जोरदार टोला पडळकर यांचे नाव न घेता पाटील यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मत चोरीबाबत केलेला आरोप खरा ठरतो आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहे. मतदानात गडबड झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मान्य करत आहेत. जो राज्यभर लोकप्रिय आहे, तो स्वतःच्या गावात निवडून येत नाही. इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही, तो मात्र सर्वाधिक मतांनी निवडून येतो, हा प्रकारच नवल असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

देशात नव्याने एक कायदा सरकार आणत आहे. ज्यात तर एखादा नेता तीस दिवस तरूंगात असेल तर त्याचे मंत्रीपद रद्द करता येते. हे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला आत टाकायचं अन् त्या राज्यातील सत्ता पाडायची, हे राज्यासाठी नवीन नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना देशाला दिली. तिची राखण सर्वांची जबाबदारी आहे. लोकशाहीर अण्णा भाऊंनी संघर्ष शब्दबद्ध केला. तोच संघर्ष आपल्याला करावा लागेल.’’

मतचोरी देवेंद्र फडवीसांना मान्य

मतचोरीवरुन पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मतांची चोरी भारतात होते हे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केले आहे. त्यामुळे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य आहे. निवडणूकाचे लागणारे निकाल खरे आहेत का नाही? याबाबत आता सर्व सामान्य देखील विचार करायला लागला आहे, असेही आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

FAQs :

प्रश्न 1: वाद कशावरून पेटला?
उत्तर: वाळवा तालुक्यावर जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून.

प्रश्न 2: गोपीचंद पडळकरांनी काय टीका केली?
उत्तर: ते म्हणाले की जयंत पाटील झुकत नाहीत, थेट पालथाच पडतात.

प्रश्न 3: जयंत पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलं?
उत्तर: त्यांनी पडळकरांना ‘हिस्ट्री सिटर’ असे संबोधले.

प्रश्न 4: ही जुंपली कुठे गाजली?
उत्तर: सांगली वाळवा आणि राज्यातील राजकीय वर्तुळात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT