L.N. Shah Sangli politics 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : जयंत पाटलांच्या विरोधी गटात फूट; अस्वस्थ नेत्याची आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा

L.N. Shah Vikas Aghadi : जयंत पाटील यांच्या विरोधात लढणाऱ्या विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एल एन शहा यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Gadkar

धर्मवीर पाटील

Sangli News : उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक विकास आघाडीत बॉम्ब फुटला आहे. ईश्वरपूर शहराच्या राजकारणात दीर्घ काळापासून माजी मंत्री, विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे, विकास आघाडीचे ज्येष्ठ सदस्य, माजी नगरसेवक एल. एन. शहा यांनी आज विकास आघाडीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा अपमान होत असल्याची खंत मनाला खोलवर वेदना देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.

एल. एन. शहा हे दीर्घकाळ विकास आघाडीच्या कार्यात सक्रीय होते. विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सुपूर्द केला. शहा यांनी पत्रात म्हटले आहे की, “विकास आघाडी हीच माझी कुंडली, माझं विचारमंदिर आणि माझं ध्येय राहिलं. अनेक वर्षांपासून मी आघाडीशी निगडीत राहून कार्य केलं. मात्र सद्यस्थितीत काम करणं शक्य नाही. हा निर्णय वेदनादायी असला तरी परिस्थितीपुढे विवश होत हा निर्णय घेत आहे. मी यापुढेही शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी निष्ठेने कार्य करत राहीन."

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आघाडीकडून प्रभाग सहामधून ते दावेदार होते. परंतु अलिकडे आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या, त्यात त्यांना एकदाही निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समजते. ते स्वतः दोनवेळा आणि त्यांच्या पत्नी लताबाई एकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत वैभव पवार यांच्या उमेदवारीसाठी त्यांना आग्रह करून अर्ज माघार घेण्यास सांगितले आणि स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता. परंतु तोही पाळला नाही.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी ते पाटील पार्टीत सदस्य होते. दिवंगत भाजपचे नेते अशोक पाटील यांच्यासोबत ते पार्टीतून बाहेर पडले आणि आजतागायत जयंत पाटील यांच्या विरोधात सक्रिय राहिले आहेत.

शहांची समजूत काढू...

विकास आघाडीचे संस्थापक विक्रम पाटील यांनी सांगितले की, शहा हे आघाडीचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी आघाडीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यावर अन्याय झालाय, हे खरे आहे. त्यांची समजूत काढू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT