Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार संजयमामा तुम्ही अपक्ष म्हणत बसु नका; आता थेट राष्ट्रवादीत या! 

आण्णा काळे

करमाळा : करमाळा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे तुम्ही राष्ट्रवादीच्या (NCP) पाठिंब्यावर आमदार झालेला आहात. आता तुम्ही अपक्ष फि पक्ष काही म्हणत बसू नका, संजयमामा तुम्ही थेट राष्ट्रवादीत या! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंञी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार दीपक साळुंखे, बारामती अॅग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, आप्पासाहेब झांजुर्णे, तानाजी झोळ, चंद्रकांत सरडे, नलिनी जाधव, अॅड. सविता शिंदे उपस्थित होते.

करमाळा येथे आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाटील म्हणाले, संजय शिंदे यांनी आत्तापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही कामाला आम्ही नकार दिलेला नाही. शिंदे यांनी आता कुठलाही विचार न करता राष्ट्रवादी पक्षाचा विचार करून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठीप्रयत्न करणे गरजेचे आहे.

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे यांनी राष्ट्रवादीला ठामपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आता मागे वळून न बघता सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे म्हणून भविष्यात विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतील ते सर्वच्या सर्व निवडून कसे येतील यासाठी प्रयत्न करावा. राष्ट्रवादीला आमदार संजयमामा शिंदे यांच्यासारख्या नेतृत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा याऐवजी करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक असे व्यासपीठावर बॅनर लावण्यात आलेला होते. पाटील यांनी बोलायला उभा राहताच. मागे बॅनरकडे ओळुन पहात आमच्या या पक्षाच्या दौ-याचे नाव परिवार संवाद यात्रा असे आहे. माञ संजयमामा बॅनरवर करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक असे लिहीले आहे. संजयमामा आमच्या पक्षाच्या कार्यक्रम परिवार संवाद याञ आहे. असे म्हणताच व्यासपीठावरील उपस्थितांनी व्यासपीठावरील बॅनरकडे वळुन पाहीले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT