Dhairyasheel Mohite Patil-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : जयंत पाटलांचा पराभव राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल; धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाकीत

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 July : शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस पक्षाची अतिरिक्त मते न मिळाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यावर माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याचा पराभव होणं, ही लाजीरवाणी गोष्ट,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, महाराष्ट्रातील जनता ही सुसंस्कृत आणि तत्वनिष्ठ नेत्यांच्या पाठीमागे जाणारी आहे. शेकापचे (PWP) जयंत पाटील (Jayant Patil) यांचा जो पराभव झाला आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल. एक वेगळं वातावरण त्यांच्या पाठीमागं सहानुभूतीपूर्वक उभं राहील, असा दावाही मोहिते पाटील यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात महाविकास आघाडीकडून तिघे, महायुतीकडून नऊ उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार जिंकले आहेत, तर महाविकास आघाडीतील दोघांचा विजय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेस पक्षाकडील अतिरिक्त 14 मते जयंत पाटील यांना मिळू शकली नाहीत, ती मते शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना मिळाली, त्यामुळे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

वास्तविक शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मिळून जयंत पाटील यांना पाठिंबा देतील, असं वाटत असतानाच ठाकरेंनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. त्याच वेळी जयंत पाटील यांची सीट धोक्यात आल्याचे दिसत होते. स्पष्टपणे दिसून येते.

मी मतांची तजबीज केली आहे, असा दावा जयंत पाटील यांच्याकडून केला जात होता. निवडणुकीनंतर शरद पवार वगळता इतर कोणीही जयंत पाटील यांना मदत केली नसल्याचे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT