Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : 'निवडणुका बघून मराठ्यांना थातूरमातूर आरक्षण देऊ नका' ; जयंत पाटलांचा इशारा!

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangli News : 'मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन दारात आल्यानंतर सरकार जागे झाले आहे. राज्यभर डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यास विलंब लागणार आहे. सरकार चुकीच्या पध्दतीने प्रकरण हाताळत आहे. लोकसभा व विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजाचे नुकसान करू नका.' अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर सांगलीत टीका केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले, 'राज्यातील डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यासासाठी वेळ लागणार आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दारात उद्या येणार आहेत. त्यानंतर सरकार जागे झाले आहे. सरकारने कसे चुकीची हाताळणी केली हे दिसून येते. टिकणारे आरक्षण द्यावे लोकसभा व विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजावर अन्याय करू नये.'

तर 'वाळवा विधानभा अथवा हातकणंगले लोकसभेचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. प्रतिक पाटील यांची चर्चा सुरू आहे. लोकांची देखील तशी मागणी आहे. माझ्या लोकसभेबाबत चर्चा आहेत. पण पक्षाचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे इच्छा जरी असली तरी पक्षाच्या चौकडीत बसून निर्णय होत असतो.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25 जानेवारी रोजी महाविकास आघाडीतील पक्षांशी बैठक आहे. काही जागांचा निर्णय झाला आहे. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याचा निर्णय आता होईल. राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. आणखी काही मिळाल्या तर त्या बोनस असतील. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणायचे आहे. वंचित बहुजन आघाडीची तशी भूमीका देखील आहे. त्यामुळे ते सहभागी झाले तर स्वागतच असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजप रामराज्य निर्माण करणार असल्याचे सांगत आहेत. पण याची संकल्पना, कल्पना मोठी आहे. त्याची तुलना करायला खूप वेळ लागले. अयोध्येला रामाचे मंदिर व्हावे, अशी सर्व देशवासिवांची भावना होती. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीचा हा वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचा निर्णय दिला. न्यासाने मंदिर उभे केले, राम हे सर्वांचे आहेत.

देशातील सर्व भाविकांनी उत्सव साजरा केला. मी देखील दर्शनाला जाणार आहे. पण गर्दी कमी झाली की जाणार आहे. प्रार्थना करेन प्रभू रामचंद्र मला पावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीयदृष्ट्या जाणीवपूर्वक रोहित पवार यांना सुनावणीची नोटीस आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पात्र-अपात्रची सुनावणी बुधवारी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. न्यायिक व्यवस्थेच्या समोर जायचे असते त्यावर आधी भाषण करणे बरोबर नसते. प्रत्येकवेळी विचार वेगळा असतो. एकच निर्णय होत नसतो. त्यामुळे आम्ही म्हणणे मांडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT