Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर कोल्हापूरकरांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील या प्रभाग रचनेवर तब्बल २४ हजार ८२० हरकती दाखल झाल्या आहेत. येत्या 31 ऑक्टोबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीचे अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या हरकतींवर काय निर्णय घेणार? याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्या अशा सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या कामाला गती आली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील असे वारंवार महायुतीतील नेत्यांकडून सांगण्यात येत होते. नंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महापालिका निवडणूक होईल असे देखील स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र राज्यात आलेल्या अस्मानी संकटानंतर प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करण्याचे वेळापत्रक बदलल्यानंतर कार्यकर्त्यांचे लक्ष आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे. यासाठी 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती घेण्याची मुदत देण्यात आली होती. तर सात नोव्हेंबरला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सर्वाधिक जयसिंगपूर नगरपालिका क्षेत्रातून 9882 इतक्या हरकती आल्या आहेत. यामध्ये विचित्र पद्धतीने प्रभाग फोडणे, रहिवासी एका वार्डमध्ये आणि मतदान दुसऱ्या वार्डमध्ये, संलग्न असलेला भाग इतरांना जोडला, शिवाय आरक्षणामध्ये देखील बदल झाला अशा विविध मुद्द्या आधारे या हरकती घेण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्यांदा होण्याची शक्यता गडद होत चाललेली आहे.
जयसिंगपूर नगरपालिका-९८८२
शिरोळ नगरपालिका - २४९८
आजरा नगरपंचायत - २२१२
वडगाव नगरपालिका - १७८३
कुरुंदवाड नगरपालिका - १६४३
गडहिंग्लज नगरपालिका - १४४८
चंदगड नगरपंचायत - १३४४
हातकणंगले नगरपंचायत - ९८३
हुपरी नगरपालिका - ९२६
कागल नगरपालिका - ६७८
मुरगुड नगरपालिका - ८५
मलकापूर नगरपालिका - १२४
पन्हाळा नगरपालिका - २१४
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.