Jaykumar Gore-Atul Bhosale-manoj gorphade-Dhairyasheel kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Politic's : जयकुमार गोरेंनी 'तो' वाद मिटवला अन्‌ चौघेही आमदार झाले!

Dhairyasheel Kadam statement : विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर धैर्यशील कदम यांच्या वक्तव्याची राजकीय चर्चा रंगली आहे. जयकुमार गोरे यांच्या भाकिताचा उल्लेख करत त्यांनी महायुतीतील समन्वयाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 22 June : विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार धैर्यशील कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कऱ्हाड उत्तर मतदारसंघासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जयकुमार गोरे यांनी त्यावेळी आम्ही चौघेही आमदार होणार, असे सांगितले होते आणि आता ते खरे ठरल. कदम यांच्या या विधानाकडे केवळ भावनिक प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर महायुती विशेषतः भाजपमधील राजकीय समन्वयाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

२००७ पासून विधानसभा निवडणुकीची संधी शोधत असलेल्या कदम यांनी गेली तीन दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने ते आमदारकीपासून दूर राहिले होते. दरम्यान, मनोज घोरपडे, अतुल भोसले आणि जयकुमार गोरे हे आपापल्या राजकीय वाटचालीत आमदार झाले. त्यामुळे चौघांच्या समीकरणात मीच बाकी होतो, असे कदम यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या काळात कदम आणि मनोज घोरपडे यांच्यात राजकीय संघर्ष होता. त्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करून महायुतीतील समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याची आठवण कदम यांनी करून दिली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून भाजपमधील अंतर्गत मतभेदांपेक्षा एकत्रित राजकीय रणनीती अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

कदम यांनी आमदारकीचे श्रेय थेट भाजप आणि महायुती नेतृत्वाला देऊन पक्षनिष्ठेचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील नेतृत्वातील स्पर्धा असूनही महायुतीतील नेते एकत्र राहिल्यास राजकीय लाभ मिळू शकतो, असा अप्रत्यक्ष संदेशही या वक्तव्यातून दिला गेला आहे.

चर्चेतील चौघे आणि असे झाले आमदार

* जयकुमार गोरे यांनी ‘चौघेही आमदार होणार’ असा दावा केल्याची कदम यांची आठवण

* धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्यात विधानसभा निवडणुकीत राजकीय संघर्ष

* अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि जयकुमार गोरे आधीच आमदार झाले.

* आता विधानपरिषदेवर निवड झाल्याने धैर्यशील कदमही आमदार.

* महायुतीतील समन्वय आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा.

* भाजप नेतृत्वावरील विश्वास आणि पक्षनिष्ठेचा संदेश अधोरेखित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT