Jitendra Awhad On Shri Ram Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

Chetan Zadpe

Shirdi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत आता राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत हिंदू संघटनांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता खुद्द आव्हाडांनीच पत्रकार परिषद देऊन पुरावे सादर केले. (Latest Marathi News)

"मी इतिहासाचा विपर्यास करीत नाही. विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. काल मी ओघात बोलून गेलो. मी बोललो की राम मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे विरोध करताहेत त्यांना सांगतो. वाल्मीकी रामायणात सहा कांड आहेत. यातलं अयोध्या कांडात श्लोक दहामध्ये रामाबाबत उल्लेख आहे. सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. माझ्या वाक्यावर मी ठाम आहे," असे आव्हाड म्हणाले आहेत.

'जे टीका करीत आहेत त्यांनी रामायण वाचलं पाहिजे, यामध्ये अयोध्या कांडामध्ये 54 व्या श्लोकात याचा उल्लेख आहे. मात्र लोकभावना आदर करून मी माझ्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र माझ्याकडे पुरावे आहेत, ते सर्वांनी वाचले पाहिजेत. मी नेहमी अभ्यास करूनच बोलतो. कोणत्याही केसेस, खटल्यांना आपण घाबरत नाही. भाजपचे आमदार राम कदम यांनी रामायण वाचलं आहे का? मुली पळवण्याचे बोलणाऱ्यांनी मला शिकवू नये," असं म्हणत त्यांनी टीका केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT