Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी; आता ताबा कोण घेणार...

Umesh Bambare-Patil

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजावर आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांची पोलिस कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना दुपारी न्यायालयात दाखल केले होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषय आक्षेपार्य वक्तव्य केले होते. या संदर्भात साताऱ्यातील शहर पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल झालेला होता. याप्रकरणी सातारा पोलिसांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून सदावर्ते यांना ताब्यात घेतले होते. साताऱ्यात आणून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावरून त्यांना आज सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती.

आज या कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांना सातारा पोलिसांनी न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी त्यांना आणखी दहा दिवस पोलिस कोठडी वाढवून मागीतली होती. पण, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणीही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे साताऱ्यातून कोल्हापूर की पुणे पोलिस त्यांना ताब्यात घेणार याची उत्सुकता होती. पण, सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक भगवान निंबाळकर म्हणाले, त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात होणार आहे. तेथूनच पुढे कोणाच्या ताब्यात दिले जाईल, हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT