Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kagal Politics: मतदानाला काही तास शिल्लक असतानाच ठाकरेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिंदेंनी फोडला

Kagal Nagarpalika election 2025: प्रत्यक्ष मतदानाला काही तास अवधी असताना माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाने पुन्हा एकदा कागल मध्ये राजकीय समेट घडवून आणली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा धनाजी नागराळे यांनी शेवटच्या क्षणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युगंधरा महेश घाटगे यांना पाठिंबा दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: या ना त्या कारणाने कागल नगरपालिकेची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर कागलच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.

तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याला खांदा लावून लढणारे मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक हे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. अशातच आता माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागल मध्ये पुन्हा एकदा राजकीय धमाका केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फोडत त्यांचा पाठिंबा मिळवला आहे.

प्रत्यक्ष मतदानाला काही तास अवधी असताना माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाने पुन्हा एकदा कागल मध्ये राजकीय समेट घडवून आणली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा धनाजी नागराळे यांनी शेवटच्या क्षणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युगंधरा महेश घाटगे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या पाठिंबा नंतर काही अंशी मंत्री मुश्रीफ आणि राजे घाटगे गट यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट आक्रमक

कागल मधील राजकारणातील प्रचाराची पातळी पाहता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कागल शहर हे संवेदनशील मतदार क्षेत्र म्हणून घोषित करा, याबाबतची मागणी ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. कागल नगरपालिका निवडणुकीत बेकायदेशीर पैशांचा वापर सुरू असून मतदारांना इशारे वजा भीती दाखवली जात आहे. कागल मधील मतदार आणि जनता भीतीयुक्त वातावरणात आहे. त्यामुळे मागणी करत असल्याचे ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी स्पष्ट केले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT