Sahakar Shiromani Election Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sahakar Shiromani Result : विजयानंतर कल्याणराव काळेंचा अभिजीत पाटलांवर हल्लाबोल; ‘विरोधकांची गुर्मी उतरवली...’

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे पॅनेलचे उमेदवार तब्बल १५०० ते २००० मतांच्या आघाडीने निवडून येण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Politic's : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतदादा काळे पॅनेलचे उमेदवार तब्बल १५०० ते २००० मतांच्या आघाडीने निवडून येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. विजयानंतर कल्याणराव काळे यांनी ‘अस्तित्वाच्या लढाईत सभासदांनी जागरुक राहून आमच्यावर विश्वास दाखवला आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Kalyanrao Kale's criticism of Abhijeet Patil after his big victory in Sahakar Shiromani)

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याच्या (Sugar Factory election) निवडणुकीत काळे गटाने अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा दणदणीत मतांनी पराभव केला. त्यानंतर कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी नाव न घेता अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच, कुठल्याही शेतकऱ्यांची देणी दिली जातील, कुणाचेही पैसे आम्ही ठेवणार नाही, असेही काळे यांनी स्पष्ट झाले.

काळे यांनी म्हटले आहे की, एका बाजूला विरोधकांकडून अमिष दाखवलं जात होतं. एकीकडे मस्ती असल्यामुळे ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने पार पडत होती. पण त्याही परिस्थितीमध्ये सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला. या निवडणुकीत भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील, संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, शेतकरी संघटना यांनी आम्हाला मोलाची साथ दिली.

ज्यांच्याकडे सहा महिन्यांची सत्ता आली. गुर्मी आणि माज विरोधकांकडे होता, तो माज जिरवण्याची जबाबदारी आमच्या सभासदांनी पार पाडली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणत पैशांचा वापर झाल्यामुळे आमचे सभासदही हैराण होऊन गेले. एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमध्ये आणि माज मस्तीमध्ये आमचा सभासद त्यांच्या अमिषाला बळी पडला नाही. त्यामुळे हा विजय कार्यर्ते, पदाधिकारी यांचा आहे, असेही काळे यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, औदुंबरअण्णा पाटील, यशवंत पाटील, वसंतराव काळे आणि भारत भालके या नेत्यांनी पंढरपूर तालुक्यात सहकार रुजवला. आम्ही सहकार म्हणून निवडणूक लढवली होती. साखर कारखान्यांमुळे पंढरपूर तालुक्यात हरीत क्रांती झाली. याचे श्रेय या संस्थापकांना जातं. या कारखान्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल आणि या सर्व सहकारी संस्था २२ वर्षांपासून चांगल्या पद्धतीने चालविल्या, त्यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला.

सभासदांनी खरा विठ्ठल परिवार दाखवून दिला

खरा विठ्ठल परिवार आज सभासदांनी दाखवून दिला आहे. आजचा विजय हा खऱ्या विठ्ठल परिवाराचा आहे. त्यामुळे उगीच कोणी खाका फुगवून चालू नये की मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे. आज खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवाराची निवडणूक पार पाडली. विठ्ठल परिवारातील सभासदांना आम्हाला एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

पाटील-काळे-भालकेंचा विचार घेऊन पुढे जाणार

औदुंबरअण्णा पाटील, यशवंत पाटील, वसंतराव काळे आणि भारत भालके यांनी ज्या पद्धतीने पूर्वी विठ्ठल परिवार चालवला. तीच तयारी आता सभासदांनी दाखवली. त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT