Prithviraj Chavan, Atul Bhosale, Balasaheb Patil
Prithviraj Chavan, Atul Bhosale, Balasaheb Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad APMC Result: काँग्रेसच्या पॅनेलचे व्यापारी गटातील दोन्ही उमेदवार विजयी; बाळासाहेब पाटलांना धक्का

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad APMC Result News: कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज व्यापारी गटाची मतमोजणी पहिल्यांदा करण्यात आली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan व काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर Udaysinh Undalkar यांच्या पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती.

बाजार समितीच्या व्यापारी गटातील ३७२ मतदारापैकी ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची मोजणी आज करण्यात आली आमदार चव्हाण व उंडाळकर गटाच्या रयत पॅनलचे जयंतीलाल पाटील यांना 259 मते मिळाली तर जगन्नाथ लावड यांना 255 मते मिळाली. विरोधी शेतकरी विकास पॅनलच्या संतोष पाटील यांना 80 राजेश शहा यांना 98 मतावर मतदारांनी रोखले. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT