Sangamnagar Agitation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan Political News : कराड-चिपळूण रस्त्याचा पैसा कोणाच्या खिशात; खड्ड्यात भात रोपे लावून सर्वपक्षीयांकडून निषेध

Umesh Bambare-Patil

-जालिंदर सत्रे

Patan Road Political News : कराड - चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत आणि जनतेला होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल आज कोयना विभागातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी 'रास्ता रोको' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध केला. आंदोलना दरम्यान आंदोलकांनी जवळपास पाऊण तास कराड-चिपळूण रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.

पाटण तालुका Patan Taluka राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP महिला अध्यक्षा स्नेहल जाधव, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब कदम, श्रमिक मुक्ती दलाचे सचिन कदम, सत्यजित शेलार, पंकज गुरव, मनसेचे दयानंद नलवडे, ठाकरे गट शिवसेनेचे अक्षय कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे Congress डॉ.कदम, संपत जाधव, अश्फाक शेख, सुरज पंधारे, संदीप ताटे यासह कोयना विभागातील विविध पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य बबन कांबळे म्हणाले, कराड - चिपळूण रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावर शेकडो खड्डे पडलेले आहेत . या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करताना नागरीकांना नाहक त्रास होत आहे पावसामुळे या खड्ड्यांची आणखीनच दुरावस्था झाली आहे.

या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले की वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांमुळे आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत तर काही मृत्यू पावले आहेत . यापुढेही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा देखभाल खर्च देखील वाढत आहे .

प्रशासनाकडे या समस्येबाबत वेळोवेळी‌ निवेदन देऊन , तक्रार करुनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे . प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता तरी याची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी त्यांनी केली.

बाळासाहेब कदम म्हणाले, या रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करण्यात आला आहे . परंतु या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असून सर्वसामान्यांचा हा पैसा कोणाच्या खिशात गेला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनीही फक्त उडवाउडवीची उत्तरे न देता लोकांच्या समस्या समजून घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी.

अन्यथा, येणाऱ्या १५ दिवसांत यापेक्षाही तीव्र आंदोलन करून कराड चिपळूण रस्त्याची वाहतूक बंद पाडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी महसूल, बांधकाम, पोलिस आदी विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी योग्यच असून संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले. आंदोलकांनीही सामंजस्याची भुमिका घेतली व हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT