कऱ्हाड : महापुरुषांबाबत बेजबाबदार वक्तव्य होत असताना खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे. त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज केंद्र व राज्य सरकारला लगावला.
विजय दिवस समाराहोसाठी खासदार शरद पवार आज येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेले काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषाबाबत बेजबाबदार वक्तव्य होत आहेत. याबाबत खुद्द भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही.
याबाबत खासदार पवार म्हणाले, खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली या प्रश्नावर खासदार शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कालचे स्टेटमेंट ऐकले, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. त्याचा योग्य तो निर्णय होईल. त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळाली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
एकच आहे की या मोर्चा संदर्भात लोकांमध्ये औत्सुक्य आहे. महापुरुषांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये राग आहे. विशेषता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जी जबाबदार व्यक्तीने केलेली विधाने सामान्य माणसांना अस्वस्थ करणारे आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या, भविष्यात दिसेल असा मला विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.