Prithviraj Chavan, Udaysingh Patil Undalkar Joins NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politics : उंडाळकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला पृथ्वीराज चव्हाणांचा छुपा पाठिंबा? उदयसिंह यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Udaysingh Patil Undalkar Joins NCP : काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी पंजाची साथ सोडत हातात घड्याळ बांधलं आहे.

Jagdish Patil

Karad News, 20 Apr : काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी पंजाची साथ सोडत हातात घड्याळ बांधलं आहे.

उदयसिंह यांच्या प्रवेशामुळे आता कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय भविष्यात या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष तीव्र होणार असल्याचं बोललं जात होतं.

मात्र, काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला जाईल असं वाटत असतानाच उदयसिंग उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारुनच आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगूनच मी दीड महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना सांगूनच आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा उदयसिंह उंडाळकरांनी केला.

दरम्यान, उंडाळकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच, उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे याचा मला आनंद असल्याचं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं. शिवाय 2014 ला विलासकाका पृथ्वीराज चव्हाण यांच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर निकाल वेगळा दिसला असता असंही अजित पवार म्हणाले.

तर उदयसिंह उंडाळकर यांची आगीतून उठून फुफुटामध्ये आलोय अशी अवस्था होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद त्यांच्या मागे उभी करणार असल्याचा विश्वास देखील अजितदादांनी यावेळी उदयसिंह यांना दिला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT