Shivaji Kardile Latest News |Latest Political News in Marathi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी कर्डिलेंचा महाविकास आघाडीला दणका

माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे राहुरी तालुक्यातील समर्थक एक एक करत राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या ( Prajakt Tanpure ) गोटात चालले आहेत.

Amit Awari

अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे राहुरी तालुक्यातील समर्थक एक एक करत राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या ( Prajakt Tanpure ) गोटात चालले आहेत. असे असतानाही शिवाजी कर्डिले यांनी न डगमगता त्यांच्या निष्ठावान समर्थकांसह महाविकास आघाडी विरूद्ध कडवी लढत देणे सुरूच ठेवले आहे. (Shivaji Kardile dominates Devgaon society: Defeats Mahavikas Aghadi )

नगर तालुक्यांमध्ये सध्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देवगाव सोसायटीवर शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरु ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.

या प्रसंगी शिवाजी कर्डिले म्हणाले की, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सेवा सोसायट्या करत असतात. शेतकऱ्यांना सेवा सोसायटीमार्फत जिल्हा बँकेकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच नगर तालुक्यातील सभासदांनी सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये मतदान करून आमच्या ताब्यात दिल्या आहेत. (Latest Political News in Marathi)

देवगाव सेवा सोसायटी वर माजी सभापती विलास शिंदे, देवगावचे सरपंच संभाजी वामन, उपसरपंच हरिदास खळे, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंभे, अंबादास शेळके, पंढरीनाथ वामन, सोमनाथ वामन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. यात सर्वच्या सर्व जागा कर्डिले समर्थकांनी मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.

नगर तालुक्यातील देवगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर शिवाजी कर्डिले यांचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल संचालक किसन वामन, भाऊसाहेब वामन, माणिक वामन, विलास शिंदे, बाळकृष्ण वामन, भाऊसाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, मच्छिंद्र शिंदे, बाबाजी खळे, सुमन शिंदे, राहीबाई शिंदे, संभाजी वामन आदींसह सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT