Shivaji Kardile
Shivaji Kardile Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या गावात कर्डिलेंचे वीजप्रश्नी आंदोलन

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) : राहुरी विधानसभा मतदार संघात भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा नेते प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) आमदार झाले. त्यांना मंत्रिमंडळात ऊर्जा व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. राज्यात सध्या महावितरणकडून थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात आहे. या विरोधात शिवाजी कर्डिले यांनी काल ( सोमवारी ) राहुरी आंदोलन केले. या प्रसंगी त्यांनी मंत्री तनपुरेंवर टीका केली. Kardile's electricity agitation in the village of Minister of State for Energy

काल (सोमवारी) राहुरी खुर्द येथे महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे धरणे आंदोलनप्रसंगी कर्डिले बोलत होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, सुरेश लांबे, रवींद्र म्हसे, नानासाहेब गागरे, दत्तात्रेय ढूस, नारायण धोंडगे, उत्तम आढाव, नंदकुमार डोळस, केशव कोळसे, कैलास पवार, युवराज गाडे, विक्रम गाढे, किरण अंत्रे, सचिन मेहेत्रे उपस्थित होते.

शिवाजी कर्डिले म्हणाले, राहुरी तालुक्यात कृषी पंपांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून जास्त भरणा करून घेतला जातो. राहुरीसाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांनी वेगळा कायदा लागू केला आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे. गंभीर झालेला विजेचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा कर्डिले यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, की मागील दोन वर्षांत जाहिरातबाजी सोडून दुसरे काम झाले नाही. राहुरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना, ब्राह्मणी व इतर पाच गावांची पाणीपुरवठा योजना श्रेय घेण्यासाठी स्थगित केली. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. महावितरणने शेतकऱ्यांची विद्युत रोहित्रे बंद करण्याचे चुकीचे धोरण हाती घेतले आहे. थकबाकी वसुलीबाबतदेखील राहुरीतील शेतकऱ्यांकडून जास्त भरणा करून घेतला जात आहे. जनता दरबार भरवून नागरिकांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या मागे उभे राहणार आहोत. त्यासाठी हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी‌ आहे, असा इशारा कर्डिले यांनी दिला.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून, शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT