sanjay shinde, jayvantrao jagtap, narayan patil, rashmi bagal  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

karmala assembly constituency : करमाळ्यात कही खुशी कही गम; संजयमामा, नारायणआबा, रश्मीताईना विधानसभेसाठी पळावे लागणार

Harshal Bagal

हर्षल बागल

Karmala Grmpnchyat Election : करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यांच्या गटात चुरस पाहावयास मिळाली. मात्र, या तिघांनी स्थानिक पातळ्यांवर आघाडी करून यश मिळवल्याने कही खुशी कही गम असे वातावरण आहे. तरी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजयमामा, नारायणआबा, रश्मीताईना विधानसभा निवडणुकीसाठी पळावे लागणार आहे.

करमाळा विधानसभेतील ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाले. त्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाला निंभोरे, घोटी, रामवाडी , गौंडरे, वीट या ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळाली. तर जेऊर, भगतवाडी, केम, राजुरी या चार ग्रामपंचायतीत नारायण पाटील गटाला वर्चस्व प्राप्त करता आले. रश्मी बागल गटाला कोर्टी ही एकहाती ग्रामपंचायत मिळाली तर चिखलठाण, कंदर, कावळवाडी , केत्तुर, रावगाव, या ग्रामपंचायतीमध्ये आमदार शिंदे, पाटिल, बागल,जगताप गटाला स्थानिक पातळीवर आघाड्या करून यश मिळाले आहे.

करमाळ्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये संजयमामा शिंदे, नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या सगळ्यांनाच समान निकालात समाधान मानावे लागले. निकाल जरी समान असला तरी माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेच्या दृष्टीने या निकालावरती चिंतन करावे लागणार आहे. संजय शिंदे २०१९ ला निवडणुकीला ऐनवेळी करमाळ्यात आले. तेव्हा त्यांना अनेक गावागावांमध्ये उमेदवार आणि पोलिंग एजंटसुद्धा मिळाले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या स्थितीला आमदार शिंदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या मूळ गावावरती लव्हे गावावर सत्ता काबीज केली. तर नारायण पाटलांच्या बालेकिल्ल्यात जेऊरमध्ये एक हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळवले. अनेक दिवस बागल गटाकडे असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिंदे यांनी चंचू प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला माढा तालुक्यातील ३६ गावांमध्ये माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांना एकाही ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवता आले नाही.

नारायण पाटील व रश्मी बागल गटासाठी वाट बिकटच

गेल्या विधानसभेचा निकाल हा माढा मतदारसंघातून करमाळा विधानसभेला जोडलेल्या ३६ गावांच्या मताधिक्यावरच अवलंबून होता. हे गेल्या विधानसभेला दिसून आले. माढ्यातील करमाळ्याला जोडलेल्या 36 गावांनी गेल्या विधानसभेला आमदार शिंदे यांच्या बाजूने 90 टक्के मतदान केल्याने आमदार शिंदे यांचा विजय झाला. तर नारायण पाटील व रश्मी बागल गटाला अद्याप माढा तालुक्यातील 36 गावांमधील ग्रामपंचायतीमध्ये खाते उघडता आलेले नाही. याउलट रोपळे ही ग्रामपंचायत नारायण पाटील गटाकडे होती. त्यावरदेखील शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे येत्या काळात नारायण पाटील व रश्मी बागल गटासाठी वाट बिकटच असणार आहे.

SCROLL FOR NEXT