Karnsingh Gaikwad Resigns from Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: तीन वेळा विधानसभा लढलेल्या काँग्रेस नेत्याचा राजीनामा; 'गोकुळ' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Congress Leader Resigns in Kolhapur: गोकुळ दूध संघ निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का. तीन वेळा विधानसभा लढवलेले कर्णसिंह गायकवाड यांनी राजीनामा देत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला.

Mangesh Mahale

Gokul election latest updates: गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांकडून संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि नवीन नेत्यांना पक्षात सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, आज वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार आहेत. कर्णसिंह गायकवाड यांचे पक्षांतर हे काँग्रेससाठी मोठा धक्का मानले जात आहे.

तीन वेळा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक

कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. शाहूवाडी तालुक्यात त्यांचा प्रभावी जनसंपर्क असून ग्रामीण भागात त्यांचे मजबूत कार्यकर्ते जाळे आहे. स्थानिक राजकारणात त्यांचे स्वतंत्र स्थान असल्याने त्यांच्या निर्णयाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

जनसुराज्य शक्तीत प्रवेश

गायकवाड यांचा पक्षप्रवेश वारणानगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा ठरण्याची शक्यता आहे.

शाहूवाडीतील राजकीय समीकरणे बदलणार

कर्णसिंह गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही जनसुराज्य शक्तीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोकुळ निवडणुकीवर होणार परिणाम?

गोकुळ निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशा वेळी प्रभावी स्थानिक नेत्यांचे पक्षांतर निवडणुकीच्या गणितावर परिणाम करू शकते.

विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील मतदार आणि दूध उत्पादक संस्थांमध्ये कर्णसिंह गायकवाड यांचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या निर्णयाचा आगामी निवडणुकीवर कितपत परिणाम होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT