Karuna Sharma News, Kolhapur Political News
Karuna Sharma News, Kolhapur Political News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

करुणा शर्मांची राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच संपण्याचा धोका!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी शिवशक्ती पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर (Kolhapur) उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरला. त्यांनी अर्ज भरला असला तरी नावामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली. करुणा शर्मा यांनीच याची कबुली दिली असून, असे घडल्यास त्यांचा अर्ज बाद ठरू शकतो. (Karuna Sharma News)

आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी जाहीर केले होते. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून झाली आहे. शर्मा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शर्मा यांच्या उमेदवारीची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर करुणा शर्मा म्हणाल्या की, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मला आशीर्वाद आहे. येथील जनता मला विधानसभेत पाठवेल. घराणेशाहीचे राजकारण संपवून कोल्हापूरचा विकास करणे हाच माझा एकमेव उद्देश आहे.

उमेदवारी अर्जातील त्यांच्या नावाबाबत आता तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर त्या म्हणाल्या की, माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत, त्याच्या आधारावरच मी अर्ज भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही त्रुटी नाहीत. तांत्रिक चुका असतील तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. त्यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहेत. तो खरा तांत्रिक मुद्दा आहेत. माझ्या अर्जात काहीच समस्या नाही, माझ्याकडे सर्व पुरावे असून, जगाला हे पुरावे दिसतील. .

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर त्या थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT