Kavinder Gupta News, Jammu and Kashmir latest Marathi news, JK news, shirdi news  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कविंदर गुप्ता म्हणाले, जम्मू काश्मिरात लोकशाहीची प्रक्रिया सुरू झालीय

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता हे मंगळवारी (ता. 3) शिर्डी येथे आले होते.

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि. अहमदनगर) - जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता हे मंगळवारी (ता. 3) शिर्डी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी कविंदर गुप्ता यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यावर तेथील परिस्थिती सुधारली असल्याचे सांगितले. ( Kavinder Gupta said that the process of democracy has started in Jammu and Kashmir )

केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांनी औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ते आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी साईप्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. (Jammu and Kashmir latest Marathi news)

कविंदर गुप्ता म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये शांततेची नवी पहाट उगवते आहे. काश्मीर खोरे पर्यटकांनी गजबजून गेले आहे. बऱ्याच वर्षांनंतर हॉटेलांवर ‘हाऊस फुल्ल’चे फलक झळकत आहेत. कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचे हे लक्षण आहे. तेथे दुबईसह विविध देशांतील उद्योजकांनी पहिल्या टप्प्यात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविलीय आहे.

ते पुढे म्हणाले की, सैन्यदलातील जवानांवरील दगडफेक आणि अतिरेकी कारवायांच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची तयारी नसायची. याच मुद्‌द्यावरून भाजपने पाठिंबा काढला आणि सरकार पडले. आता कुठेही दगडफेकीच्या घटना नाहीत. सैन्यदलाचे मनोबल उंचावले, अतिरेकी मोठ्या संख्येने मारले जात आहेत. कायदा व सुव्यवस्था सुधारल्याने काश्मीर खोरे पुन्हा पर्यटकांनी गजबजून गेले. सामान्य जनतेला रोजगार मिळतोय. लोक खूष आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींसोबत तेथे येऊन संवाद साधला. केंद्राकडून थेट ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर विकास निधी येतो. देशात आजवर 13 वेळा स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका झाल्या, तर आमच्याकडे केवळ चार वेळा झाल्यात. यावरून तेथे पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व लक्षात येते. जम्मू काश्मिरात या निवडणुकांमुळे लोकशाहीची प्रक्रिया सुरू झालीय.

दुबईतील उद्योगपतींचे शिष्टमंडळ तेथे भेट देऊन गेले. पहिल्या टप्प्यात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येते आहे. ही गुंतवणूक एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. नवे उद्योग सुरू झाले, की रोजगारनिर्मिती होईल. हा बदल कशामुळे झाला, हे सांगण्याची गरज नाही. अतिरेकी कारवाया सुरू आहेत. यापुढेही त्या सुरूच राहतील. मात्र, पूर्वीपेक्षा त्या फारच कमी झाल्यात. अतिरेक्यांकडे आता आधुनिक शस्त्रे नसतात. ते फारसे प्रशिक्षितही नसतात, असे निरीक्षण सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. हा बदल नाही काय?

पुनर्वसनावर भाष्य करणे घाईचे ठरेल

काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांवरील अत्याचार व त्यांचे स्थलांतर हे मुद्दे देशभर चर्चिले गेले. त्यांचे खोऱ्यात पुनर्वसन शक्य आहे का, असे विचारले असता, कविंदर गुप्ता म्हणाले, की काश्‍मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या विषयावर लगेचच भाष्य करणे घाईचे ठरेल. मात्र, नव्या विधानसभेत त्यांच्यासाठी दोन जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT