Minister Hasan Mushrif addressing party workers in Kolhapur, announcing stance on KDC Bank election and gearing up for Gokul Milk Union polls. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार! पण मुश्रीफांचं एकच 'लक्ष्य' 'गोकुळ' दूध संघ

Kolhapur District Co Operative Bank Election : नव्या सहकारी बँक नियमांमुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसी बँक निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले. मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश दिले.

Rahul Gadkar

Kolhapur District Co Operative Bank Election : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या असल्या तरी राजकारणात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळची निवडणूक याच वर्षात होणार आहे. मात्र याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आतापासूनच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. बँकिंग क्षेत्राच्या नव्या नियमामुळे आपल्याला थांबावं लागेल, असे सांगत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

केंद्र सरकारमधील सहकार खात्याच्या बँकिंग कायद्यातील दुरुस्तीनुसार एकूण दहा वर्षे सहकारी बँकेच्या संचालक पदावर काम केलेल्या व्यक्तीस पुन्हा निवडणूक लढवता येणार नसल्याने केडीसीसी बँकेच्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत बँकेचे चेअरमन, मंत्री हसन मुश्रीफ, व्हा. चेअरमन राजू आवळे यांचेसह तब्बल डझनभर संचालक केडीसीसी बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. मात्र या निर्णयाच्या विरोधात काही मंडळींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवले असून न्यायालयाच्या निर्णयावरच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मातब्बर संचालकांचे भवितव्य ठरणार आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य सत्कार समारंभात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार सहकारी बँकेत आता प्रत्येकाला सलग दहा वर्ष संचालक राहता येणार आहे. न्यायालयात त्याबाबत निकाल असला तर संपूर्ण देशभर हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे आपल्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थांबावे लागेल असे मंत्री मुश्रीफ म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्रीय सहकार विभाग बँकिंग नियमन कायदा सुधारणेबाबत ठाम असल्याने देशभरात या नव्या नियमाची अंमलबजावणी रिझर्व्ह बँकेकडून सुरू झाली आहे. या निर्णयाचा फटका सतेज पाटील, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संतोष पाटील यांना बसणार आहे.

तर दुसरीकडे केडीसी बँकेच्या भूमिकेबाबत बोलल्यानंतर पुढील सहा महिन्यात होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी आपला मोर्चा गोकुळ दूध संघाकडे वळवला आहे. पुढील महिन्यात गोकुळ दूध संघाचे ठराव गोळा करण्यासाठी सुरुवात होईल. सर्वात जास्त ठराव राष्ट्रवादीकडे कसे येतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT