-सुनील पाटील /ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : ''साहेब बँकेत सगळे चोर आहेत, निवडणुकीत एकमेकांवर टीका करतात. नंतर गळ्यात गळे. बँकेवर कायमस्वरूपी प्रशासक नेमा,'' अशा शब्दात मतदारांनी मतपेटीत चिठ्य़ा टाकल्याचे समोर आले आहे. मतमोजणीत या अशा मजकुराच्या चिठ्य़ा सापडल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीमध्ये मतदारांनी पन्नास रुपयांची ओवाळणी ही दिली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीला (kdcc bank election) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली पहिल्यांदा मतपेट्या उघडून मतपत्रिका बाहेर काढण्यात आल्या यावेळी काही मतदारांनी मतपत्रिकेवर वरच काही मजेशीर चिठ्ठ्या टाकल्याचे दिसून आले. ''एकाच अटीवर साहेब बँकेत सगळेच चोर निवडणूक आली की एकमेकांवर टीका, नंतर गळ्यात गळे. त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमा,'' असा मजकूर लिहिला होता.
मुश्रीफ साहेब यांच्या एका समर्थकांन कागलच्या राजकारणाचे गणितच चिठ्ठीतून सांगितले. मुश्रीफ साहेबांच्या जवळ एक टोळके आहे. निवडणूक आली की ते साहेबांच्या जवळ जाते. आणि कुठेच काम होऊ देत नाही. समरजीत घाडगे यांच्या जवळ पण असाच एक गट आहे. तो कोणाचीच काम होऊ देत नाही. अशा काही चिखलातून मतदारांनी आपली खंत व्यक्त केली.
दरम्यान सकाळी आठ वाजता मतपेट्या उघडून मतपत्रिका यांचे वर्गीकरण करण्यात आले त्यानंतर गटनिहाय मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल. अशी माहिती निवडणूक अधिकारी काकडे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी मंगळवारी (ता. 5) चुरशीने मतदान झाले, त्यानंतर कोण-कोणत्या गटात चुरस होईल, याची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. बॅंकेच्या शिरोळ संस्था गटातून उमेदवार असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान झाल्यानंतर विजयी जल्लोष केला. तसेच, त्यांच्या विजयाचे डिजिटल फलकही झळकले आहेत. यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांनीही तेवढ्याच ताकदीने प्रचार करुन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. शिवाय त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.