Deepak Kesarkar
Deepak Kesarkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना केसरकर करत होते साईबाबांची आरती

सरकारनामा ब्युरो

शिर्डी - राज्यातील शिवसेनेचा कोणता गट खरा याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) हे शिर्डीत दाखल झाले. त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सहभाग घेतला. ही आरती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ( Kesarkar was doing Saibaba's aarti while the Supreme Court hearing was going on )

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेबाबत सुनावणी सुरू आहे. राज्यात शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री व आमदार घेऊन भाजप बरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

राज्यातील शिवसेनेतही मोठी फुट पडली आहे. शिवसेनेचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या गटात जात आहेत. काल ( मंगळवारी ) शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे यांच्या बरोबर गेले. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेचे पक्ष चिन्ह, ध्वज यावर अधिकार कोणाचा हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचा गट बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर हे तिसऱ्यांदा साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी आले आहेत. आज दुपारी ते शिर्डीत आले. त्यानंतर त्यांनी लगेच मध्यान्ह आरतीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवादसाधने टाळले. मागील महिन्याभरात शिंदे गटाचे काही आमदार शिर्डीत येऊन गेले आहेत. मात्र आज न्यायालयीन सुनावणी सुरू असताना केसरकरांनी आरतीत सहभागी होणे यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT