Senior NCP leader and former ZP vice-president Nitin Bhargude-Patil joins BJP in Satara in the presence of rural development minister Jaykumar Gore. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Election : मकरंदआबांसोबत जिल्हा परिषदेचं प्लॅनिंग केलेला नेता भाजपमध्ये : मंत्री जयकुमार गोरेंनी बिघडवलं राष्ट्रवादीचं गणित

Nitin Bhargude Patil BJP entry Khandala taluka politics : खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीआधीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सातारा येथे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या प्रवेशानंतर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांना मोठा धक्का बसला बसल्याचे बोलले जाते.

नितीन भरगुडे-पाटील यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसची ‘मुलूखमैदानी तोफ’ म्हणून राहिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गेल्या चार दशकांपासून त्यांनी खंडाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. मकरंद पाटील यांनी भरगुडे पाटील यांच्यासोबतच बसून वाई विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटांचं सगळं नियोजन केले होते.

2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरवळ गटातून नितीन भरगुडे-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उदय कबुले यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली होती. अनुभवी नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपची वाट धरल्याने तालुक्यातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.

सत्तेसाठी नाही, तर दिवंगत लक्षणराव भरगुडे- पाटील यांचे अनेक वर्षे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी व जनतेच्या हिताच्या कामासाठी भाजपमध्ये काम करण्याचे ठरवले आहे. असे नितीन भरगुडे-पाटील यांनी सांगितले.

पक्षांतराचे सत्र सुरूच

खंडाळा तालुक्यात केवळ भरगुडे-पाटीलच नव्हे, तर इतरही अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षबदल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्याचे माजी सभापती आणि तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रा. एस. वाय. पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. नितीन सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी सभापती आणि शिरवळचे गुरुदेव बरदाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दिग्गज नेत्यांच्या पक्षांतरामुळे खंडाळा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि रंजक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT