अहमदनगर - आयएनएस विक्रांतच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला होता. यावरून अहमदनगर शहर शिवसेनेने आज किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांच्या विरोधात आंदोलन केले. ( Kirit Somaiya should be expelled from BJP ... )
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून गोळा केलेल्या पैशांचा महाराष्ट्राचा देशद्रोही किरीट सोमय्या यांचा शहर शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाहीर निषेध करुन निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनप्पा, काका शेळके, शरद कोके, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, बंटी खैरे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे, अण्णा घोलप आदी उपस्थित होते.
संभाजी कदम म्हणाले, आयएनएस विक्रांत या युद्ध नौकेने भारतीय सैन्यसाठी महत्वाची भुमिका बजावली होती. सैनिकांबरोबरच देशाचा अभिमान असलेल्या या विक्रांतचे ऐतिहासिक महत्व पाहता तिचे जतन व्हावे, भावी पिढीला या युद्धनौकेचा इतिहास कळावा, यासाठी जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला, यासाठी लोकसहभागही घेण्यात आला.
संभाजी कदम पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या सारख्या भ्रष्ट लोकांना विक्रांतच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करुन तो आपल्या खिशात घातला आहे, अशा देशद्रोही व्यक्तीला भाजपने पक्षातून हकलपट्टी करावी व गोळा केलेल्या पैसे वसूल करण्यात यावा, अशी मागणी आम्ही करत असल्याचे सांगून किरीट सोमय्या यांच्या निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी संजय शेंडगे, अभिषेक कळमकर, गणेश कवडे यांनीही किरीट सोमय्यांनी विक्रांतच्या नावावर केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.