Gram Panchayat Election News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchyat Election: ना गुलाल,ना फटाक्यांचा आव्वाज..! कोल्हापुरातील 22 ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतीक्षा

Kolhapur News : गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे त्यानंतर काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने त्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा अडकली. म्हणून या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया रखडली.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे या 22 ग्रामपंचायतील गावगाड्यांचे राजकारण थांबले आहे. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या 22 ग्रामपंचायतीचा कारभार अधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यांच्याकडूनच कारभार सुरू आहे. अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणुकांबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे अजून काही महिने यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे त्यानंतर काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने त्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा अडकली. म्हणून या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया रखडली.

याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसंदर्भात (Gram Panchayat) राज्य निवडणूक आयोगाला कळविले. परंतु, निवडणुका झाल्या नसल्याने या ग्रामपंचायतींचा कारभार सुरू ठेवण्यासाठी प्रशासक नेमणे क्रमप्राप्त होते.

गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी प्रशासकच कारभार करत आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडूनही मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाला कळविले आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांत कोणतेही निर्देश आयोगाकडून आलेले नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे कारभारी हे प्रशासक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’

बोरपाडळे, काळजवडे, पिसात्री, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा), आलतुर, भेंडवडे, चांदोली-घोळसवडे, पुसार्ले (ता. शाहूवाडी), आगर, टाकळी (ता. शिरोळ), केर्ले (ता. करवीर), चौंडाळ, सावर्डे खुर्द, सुरुपली (ता. कागल), निळपण (ता. भुदरगड), मजरे कारवे, मौजे कारवे, कामेवाडी (ता. चंदगड), अत्याळ, हणमंतवाडी, नांगनूर, तनवडी (ता. गडहिंग्लज).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT