Dhananjay Mahadik - Mahadeorao mahadik
Dhananjay Mahadik - Mahadeorao mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात महाडिकांचे वर्चस्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur) विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. आज दिल्लीत असलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दुपारी फोन आल्यानंतर भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) आणि डमी उमेदवार शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती भाजप प्रवक्ते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध झाली आहे.

अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, राज्यात कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात कोणत्याही निवडणूका होवू शकल्या नव्हत्या. मात्र आगामी काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे राज्यात समन्वय आणि सलोखा रहावा, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक झाली. यात मुंबई आणि धुळे-नंदूरबार या जागांच्या बदल्यात कोल्हापूरची जागा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आणि पक्षादेशानुसार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे अर्ज मागे घेतला.

धनंजय महाडिक यांनी यावेळी अमल महाडिक यांना पाठिंबा देणाऱ्या जनसुराज्य पक्ष, प्रकाश आवाडे गट, इतर मित्र पक्षांचे आणि मतदारांचे आभार मानले. तसेच पुर्वी आपण महाडिक गट म्हणून काम करत होतो, पण आज संपूर्ण महाडिक कुटुंबिय भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आहे. आपल्याकडे विजय होण्याइतकी सदस्य संख्या होती पण पक्षादेश म्हणून इथे थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचेही धनंजय महाडिक म्हणाले. तसेच आता न्यायालयीन लढाईवरही बोलण्यात अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमध्ये महाडिक कुटुंबियांच्या दृष्टीने हा अर्ज मागे घेण्याची गोष्ट कितपत योग्य होती? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावर धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरमध्ये महाडिक कुटुंबियांचे वर्चस्व कालही होते, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. ते वर्चस्व कमी होत नाही, होणारही नाही. पण भाजपमध्ये असल्यामुळे पक्षादेश मानने आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT