kolhapur Police News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : कोट्यवधींच्या मायाजाळात पोलिस अधिकारी ? तपास अधिकारी गायकवाडांसह आठ जणांना नोटीस

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंटच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात कोल्हापूर पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयाची असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर पोलिसांवर संशयाची सुई गडद झाल्याने गृहखात्याने गंभीर दखल घेतली आहे. तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाडसह आठ जणांना शुक्रवारी नोटिसा बजावल्या आहेत. शनिवारी (आज) या आठ जणांची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह सांगलीतील नागरिकांना ए. एस. ट्रेडर्स कंपनीच्या नावाखाली अनेकांना गंडा घालण्यात आला होता. या कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा करणाऱ्या लोहितसिंग सुभेदार याला नुकत्याच कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, कृती समितीने या प्रकरणाचा तपास असलेल्या अधिकाऱ्यांच्या वरच संशयाची सुई धरत त्याबाबतची तक्रार गृह खात्याकडे केली. त्यानुसार उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकड़े चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.

चौकशी अधिकारी पत्की यांनी स्वाती गायकवाडसह तपास प्रक्रियेतील सहभागी घटक तसेच तक्रारदार कृती समितीचे रोहित ओतारी, विश्वजित जाधव, गौरव पाटील, महेश धनवडे, अमित साळोखे यांना शुक्रवारी नोटीस बजावली. यात कागदपत्रांसह आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गायकवाडांवर कारवाईची मागणी

संबंधित कंपनीविरोधात तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडे तपास देण्यात आला होता. मात्र, कंपनीविरोधी कृती समितीने तत्कालीन तपासाधिकारी स्वाती गायकवाड यांच्यावर कारवाईची राज्याच्या पोलिस महासंचालकांकड़े तक्रार केली.

माजी मंत्र्याचा स्वीकृत नगरसेवक रडारवर

या घोटाळ्यातील संशयित आशिष गावडे याला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधील रेकॉर्डिगमध्ये सांगलीतील स्वीकृत नगरसेवकाचे नाव निष्पन्न झाले. संबंधित नगरसेवक एका माजी मंत्र्यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते.

तपास अधिकाऱ्यांवर रोष का?

लोहितसिंग सुभेदार या पोलिसांपासून संरक्षण देण्यासाठी संबंधित नगरसेवकाचा हात असल्याचे सांगितले जाते. नगरसेवकाने ११०० कोटींची रक्कम हवालामार्फत पाठविल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अटक न करता जबाब घेऊन सोडून दिले. सुभेदारला पैसा, गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित नगरसेवकाचा हात असल्याचे सांगितले जाते. असे असताना त्या नगरसेवकाला तपास अधिकाऱ्यांनी पुढे आणले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT