Local body elections Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mayor Reservation : महापौर आरक्षणानंतर महापालिका रणांगणांची उलटी गिनती; कारभाऱ्यावर ठरणार महायुतीची दिशा

Kolhapur Ichalkaranji Sangli Kupwad Civic Polls After Diwali : पुढील दहा ते पंधरा दिवसात राज्यातील महापालिकांवर महापौर आरक्षण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच महायुतीचे राजकारणाची रणनीती ठरणार आहे.

Rahul Gadkar

Diwali Municipal Elections Maharashtra: कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली-कुपवाड महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांच्या बैठका, दुसऱ्या फळीतील नेत्यांचे दौरे, गाठीभेटी वाढल्यानंतर दिवाळीनंतरच महापालिकांच्या निवडणुकींचे राजकीय फटाके फुटणार आहेत.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात कोणाची सत्ता असणार? याचे गणित मांडायला सुरूवात आहे. अशातच शासनाकडून राज्यातील महापालिकांकडून मागील वेळी महापौर आरक्षण माहिती मागवली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात राज्यातील महापालिकांवर महापौर आरक्षण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच महायुतीचे राजकारणाची रणनीती ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरसह राज्यातील अनेक महापालिकेंवर प्रशासक राज आहे. पाच वर्षे निवडणूक न झाल्याने शहरातील विकास कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रखडलेल्या सर्वच महापालिकांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेतल्या जाणार आहेत.

प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 9 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापौरपदाचे आरक्षण आणि प्रभागाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. या आरक्षणानंतरच (Reservation) महापालिकाच्या निवडणुकीमध्ये खरी रंगात चढणार आहे.

महापालिकेच्या रणसंग्रामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. महायुतीतील (Mahayuti) मुख्य पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना यांनी निवडणुकीची तयारी सूरू केली आहे. तर महाविकास आघाडीच्या गोठात अद्याप तरी शांतता आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, यांच्यासह सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाड़े, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची रणनीती आखली जात आहे. जनसुराज्य पक्षानेही तयारी केली आहे.

कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा आहे. पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर, सत्यजित उर्फ नाना कदम, शारंगधर देशमुख, यांनी इच्छुकांची फौज तयार केली आहे. तर भाजपने ही त्याच पद्धतीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच अधिकच्या जागा घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार महाडिक यांच्याकडून 50 जागांवर दावा करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

सध्या राष्ट्रवादीच्या गोठात हालचाली कमी असल्या तरी मंत्री मुश्रीफ यांची राजकीय पकड पाहता वेळी राष्ट्रवादी आपली मागणी महायुतीसमोर ठेवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून केवळ 'वेट आणि वॉच' हीच भूमिका ठेवली जात आहे. तर इचलकरंजीत चुकांचा ओढा भाजपकडे आहे.

आमदार राहुल आवाडे, जामदार सुरेश हळवणकर यांच्याकडून महायुतीत वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने एकला चलो इशारा महाविकास आघाडीला दिला आहे. तर शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी देखील स्वतंत्र चाचपणी केली आहे.

सांगलीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून महिन्यातून दोन ते तीन वेळा सांगलीचे दौरे सुरू आहेत. शिंदेसेना व राष्ट्रवादी भाजपकडे जागांसाठी आग्रही राहणार आहे.

महाआघाडीत एकजुटीसाठी धडपड सुरू आहे. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल यांनी पालिकेसह जिल्हा परिषद पातळीवर विशेष दौरे आयोजित केले आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाड़ी व्हावी, यासाठी इच्छुकांनीही देव पाण्यात ठेवलेत. दिवाळीनंतर निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT