Kolhapur News: गोकुळ दूध संघ (Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) येथील गडमुडशिंगी पशुखाद्य कारखान्यात वाहतुकीचे अंतर वाढवून 35 लाखांचा अपहार झाल्याची चर्चा गोकुळ दूध संघामध्ये (Gokul Dudh Sangh) जोर धरू लागली आहे. गोकुळ दूध संघामधील वरिष्ठ व्यक्तीच्या संगनमताने हा अपहार झाल्याची माहिती आहे. मात्र पशुखाद्य कारखान्यातील व्यक्तीवर हे प्रकरण शेकणार असे निदर्शनास आल्यानंतर त्या व्यक्तीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.
आत्महत्या करताना या प्रकरणात असणाऱ्या सर्वांची नावे लिहिणार अशी थेट धमकी दिल्याने संबंधितांनी हे प्रकरण आपापसात मिटवण्याचा प्रकार सुरू केला आहे. चर्चेअंती 35 लाख रुपये भरण्याचे ही ठरल्याची माहिती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर जिल्हा उत्पादक दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाकडून गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्यातून गोकुळ दूध संघाला खाद्य पुरवले जाते. हा पशुखाद्य पुरवठा करण्यासाठी वाहतूक संस्थांना याचा ठेका दिला आहे. यामध्ये एका दुर्गम तालुक्यातील वाहतूकदाराचाही समावेश आहे.
वाहतूकदाराने आणि एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीचे अंतर वाढवून जवळपास 35 लाखाचा अपहर केल्याची चर्चा सध्या गोकुळ दूध संघाचा आहे. वाहतुकीचे अंतर वाढवून 35 लाख रुपयांची बिले ही काढली असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर गोकुळ दूध संघात खळबळ उडाले असून दबक्या आवाजात याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणांमध्ये पशुखाद्य कारखान्यातील दोघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र त्यातील एका कर्मचाऱ्यांनी थेट एका जबाबदार अधिकाऱ्याचे नाव घेत थेट आत्महत्या करण्याची धमकी देत सर्वांची नावे उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आपले नाव येण्याच्या भीतीने संबंधित वाहतूकदार आणि वरिष्ठांशी चर्चा करून हे प्रकरण आपापसात मिटवण्याचे ठरवले आहे. हे प्रकरण वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी आज त्याबाबत ३५ लाख रुपये भरण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या प्रकाराची माहिती गोकुळ मधील वरिष्ठ नेत्यांना देखील नाही. याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी विशेष यंत्रणा काम करत होती. शिवाय गोकुळ मधील विरोधकांनाही याची माहिती कशी नाही? याची देखील चर्चा सध्या गोकुळ मध्ये आहे. आज या प्रकरणावर कायमचा पडदा टाकण्यासाठी काही जणांची बैठक होणार आहे. बैठकीत या प्रकरणावर मार्गही निघेल. मात्र पैसे हडपण्याची संस्कृती गोकुळमध्ये जाण्याचे नाव घेत नाही. अशी चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.