पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur High Court Bench : कोल्हापूरकरांसाठी सर्वात मोठी बातमी! खंडपीठासाठी तब्बल 495 जागांची लवकरच होणार भरती...

Kolhapur High Court bench recruitment latest news : कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी! खंडपीठासाठी तब्बल 495 जागा लवकरच भरण्याची शक्यता आहे. नेमका निर्णय काय आणि कोल्हापूर खंडपीठाच्या प्रक्रियेला यामुळे काय वेग मिळणार? जाणून घ्या.

Rahul Gadkar

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बँकेच्या स्थापनेला एक वर्ष झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नुकताच शिवाजी विद्यापीठ येथे सोहळा पार पडला. या सोहळ्यात कोल्हापूर सर्किट बेंच संदर्भात आणि खंडपीठ संदर्भात मोठी घोषणा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी केली. कोल्हापूर सर्किट बँकेचे आता 75 एकर जागेत खंडपीठात विस्तारण्यात येणार आहे. शिवाय खंडपीठासाठी नव्याने लवकरच 495 जागांची भरती केली जाणार असण्याची घोषणा करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच हे लवकरच खंडपीठात रूपांतर होणार आहे. त्यासाठी लवकरच ही भरती करणार असल्याची माहिती न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित होते.

सध्या सर्किट बेंच हे सीपीआर येथील परिसरात चालते. तर शेंडा पार्क येथील 75 एकर परिसरात नवीन खंडपीठाचे जागा विस्तारित आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 75 एकर जागेची कागदपत्रे, सातबारा काल न्यायमूर्ती घुगे यांच्याकडे सुपूर्द केला.

दरम्यान सर्किट बँकेला वर्ष पूर्तता झाल्यानंतर भूषण गवई यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूरला खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरची रेष आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही. असे गवई म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT