Kolhapur Well Scam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : जुनी विहीर नव्याने बांधली, सरपंचाने पाच लाख खाल्ले, मंडलिक गटाच्या आरोपाने वातावरण टाईट

Kolhapur Well Scam : लिंगनूर कापशी येथे जुन्या विहिरीला नवी दाखवून पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा मंडलिक गटाचा आरोप. माजी सरपंच, ग्रामरोजगार सेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनरेगा निधी हडपल्याचा दावा.

Rahul Gadkar

Kolhapur News : जुन्या विहिरीलाच नवीन विहीर दाखवून राज्य सरकारकडून पाच लाख उकळण्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी इथे घडला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या माजी सरपंचाने हा प्रकार केला असल्याचा आरोप मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लिंगनूर (कापशी) गावातील माजी सरपंच राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस तालुका अध्यक्ष मयूर उर्फ राहल नेताजी आवळेकर याने आपल्या पदाचा गैरवापर करत हा प्रकार केला असल्याचा आरोप शिवसेना तालुका उपप्रमुख प्रमोद कुराडे यांनी केला आहे.

संबंधित माजी सरपंच मयूर आवळेकर याने शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी जाधव याला हाताशी धरून संगनमताने आपल्या 2016 -17 ला काढलेल्या जुन्या विहिरीवर, ग्रामसभेमार्फत नव्या विहिरीचा प्रस्ताव जाणे अपेक्षित असताना सर्व नियम डावलून 8 मे 2025 रोजी कशाची मान्यता मिळवली? शिवाय एक दिवस अगोदर 7 मे 2025 रोजी जॉब कार्ड संबंधित लाभार्थ्यांनी काढले. एका दिवसात ग्रामसभेची परवानगी, दुसऱ्या दिवशी पंचायत समिती सदर प्रस्ताव मंजूर केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शासनाची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकारी यांनी देखील कार्यतत्परता दाखवली. लाभ घेणारा मारजी सरपंच आवळेकर यांने विहीरीचा सातबारा उताऱ्यावर 2022-23 मध्ये नोंद घातली असून काम न करता रोजगार हमी (मनोरगा)मध्ये पैशाची उचल त्यांनी आपला भाऊ अमर आवळेकर आहे. जो ग्रामरोजगार सेवक असून खोटी कागदपत्रे रंगवून रोजगार हमी माणेरेगाचे पैसे हडप केल्या असल्याचा आरोप यावेळी कुऱ्हाडे यांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर अमर आवळेकर यांनी आपल्या घरातील व्यक्तीचे प्रियंका आवळेकर तसे अनेक संबंधितांची खोटी जॉब कार्ड तयार केली आहे. सदरची विहीर ही शासन नियमान्सार सार्वजनिक भूजल स्वतःपासून 500 मीटरच्या जवळ असूनही हा नियम असताना देखील सदर विहिरीचा प्रस्ताव मान्य झालेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, विरोधकांचे आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. शासनाच्या नियमानुसारच आपण विहिरीचे काम केले आहे. निवडणूक तोंडावर आल्याने विरोधकांचे आरोप सुरू आहेत. लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करणार आहे. असे स्पष्टीकरण मयूर आवळेकर यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT