Hasan Mushrif, Dhairyasheel Mane, BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: मुश्रीफ यांनी जुनी मैत्री विसरावी, काँग्रेस नेत्यांचे लाड...

Kolhapur Loksabha Constituency : "प्रचाराला भाजपचे कार्यकर्ते आणि गुणगान गाणार काँग्रेस नेत्यांचे, एकदा ठरलं की ठरलं! विरोधक म्हणजे विरोधकच. आता आपण शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा यांचा गट महायुतीत एकत्र आहोत."

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha Election 2024: मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर केलेला हल्लाबोल भाजपचे (BJP) कार्यकर्ते अद्याप विसरलेले नाहीत. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांची केलेली स्तुतीदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. याची झलक आजच्या महायुतीच्या आढावा बैठकीत पाहायला मिळाली. हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे, तर आज पुन्हा कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड खासदार मंडलिक याच्यासमोर नाराजी व्यक्त केली.

हातकणंगलेचे (Hatkanangale) विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) हे काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती करतात. यंदाच्या निवडणुकीत भाजप तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे आमच्या स्टेजवरून काँग्रेस नेत्यांची स्तुती खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या विजयासाठी जिवाचे रान करू, तक्रारीचे एकही कारण आम्ही तुम्हाला देणार नाही. पण काँग्रेस नेत्यांचे गुणगान गाऊ नका, अशा शब्दांत भाजपचे नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी महायुतीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचाराला भाजपचे (BJP) कार्यकर्ते आणि गुणगान गाणार काँग्रेस (Congress) नेत्यांचे, एकदा ठरलं की ठरलं! विरोधक म्हणजे विरोधकच. आता आपण शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट महायुतीत एकत्र आहोत. मला आता या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनादेखील सूचित करायचे आहे की, आता आपण महायुतीत आहोत त्यामुळे महायुतीतील नेत्यांचेच ऐकले पाहिजे. तुमची जुनी मैत्री वगैरे काही असेल तर विसरून जावा. आम्ही रक्ताचे पाणी करतोय. इथून पुढे महापालिका, विधानसभा केडीसी, गोकुळ निवडणूक आहे. तिथे विरोधात आणि इकडे सोबत असले आता काय चालणार नाही. आता आर नाही तर पार. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्हालादेखील सोन्याचे दिवस आले पाहिजेत, या शब्दात महेश जाधव यांनी बैठकीत सुनावले.

आम्ही भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. जर इकडे तिकडे काहीतरी झालं तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई कार्यकर्त्यांवर करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. खासदार संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा कोणीही मागे पडू नका, अशा सूचनाही या वेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. त्यामुळे आता कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शब्द युतीतील नेते आणि त्यांचे कार्यकर्ते किती पाळणार पाहणं महत्त्वाचं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT