Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election: कोल्हापूरकर सगळेच राजहट्ट पुरवणार नाहीत; मंडलिकांच्या निशाण्यावर शाहू महाराज

Sanjay Mandlik On Chhatrapati Shahu Maharaj: "आम्हालाही कोणावर टीका करण्यात रस नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्हीदेखील कोल्हापूरकर आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं."

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Lok Sabha Election 2024: "कोल्हापूरच्या (Kolhapur) गादीवर ज्या पद्धतीने ते आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीतही आहे. पण सगळे राजहट्ट कोल्हापूरची जनता पुरवणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकले जातात, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्या पद्धतीनेच सर्व काही होणार", असं म्हणत महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आघाडीचे उमेदवार शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्यापासून प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट सामना होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. अशातच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), भाजप नेते चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांसह काँग्रेस नेते सतेज पाटलांवर (Satej Patil) हल्लाबोल केला आहे.

संजय मंडलिक म्हणाले, "सतेज पाटील तुम्हाला मी आताच चुकीचा कसा वाटायला लागलो? 2026 पर्यंत संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा विकास करेल असं म्हटला होतात. तुम्हालाच निवडणुकीला उभं राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराजांना गळ घातली.

ते ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या (Kolhapur) गादीवर आले तसाच राजहट्ट त्यांचा लोकसभा निवडणुकीत आहे. पण सगळेच राजहट्ट कोल्हापूरची जनता पुरवणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो, टांग मारली जाते, अंगावर माती टाकली जाते त्या पद्धतीनेच सर्व काही होणार आहे," असा इशाराच मंडलिक यांनी दिला.

तसेच सतेज पाटलांना कालपर्यंत मी पुरोगामी दिसत होतो आज अचानक त्यांना मी प्रतिगामी दिसायला लागलो. परंतु, कोल्हापुरात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाहू विचारांचा आहे. इथल्या पाण्यामध्ये, मातीमध्ये, इथल्या डीएनएमध्ये शाहूंचे विचार असल्याचंही मंडलिक म्हणाले.

शिवाय शाहू महाराजांनी प्रत्येक घरात पुरोगामी विचार नेण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्याप्रमाणे आता निवडणुकीला उभं राहिलेल्या वारसदारानेदेखील काय काम केलं हे सांगितलं पाहिजे. आम्हालाही कोणावर टीका करण्यात रस नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्हीदेखील कोल्हापूरकर आहोत. हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्या पद्धतीच्या बोरी त्या पद्धतीच्या बाभळी असणार, असंही मंडलिकांनी म्हटलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT