Sanjay Madnlik And V B Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

V B Patil On Sanjay Mandlik : 'भाजपचे षडयंत्र ओळखले नाही', व्ही. बी. पाटलांनी केली मंडलिकांची खरडपट्टी

Rahul Gadkar

Lok Sabha Election Marathi News : छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे करणे हे शरद पवार यांचे षडयंत्र आहे, अशी टीका दोन दिवसांपूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी केली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. संजय मंडलिक यांचे अशा पद्धतीचे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणा आहे, अशा शब्दांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

2009 ची निवडणूक ही सदाशिवराव मंडलिक (Sadashivrao Mandlik ) यांनी एका वेगळ्या वळणावर लढवली हे सर्वांनाच माहीत आहे. मंडलिक साहेबांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या विरोधात आपला आवाज उठवला होता. फुले, शाहू, आंबेडकर विचार शेवटपर्यंत जपला. हे जपत असताना कधीही कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही. हे त्यांचे मोठेपण होते.

परंतु, आज खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पवारसाहेबांवर टीका करून नेमकं स्वतःचं हसू करून घेतलं आहे. आपण पूर्णतः जातीयवादी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलो आहोत हा दोष तुमचा आहे. अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही. हे भाजपचे षडयंत्र आपल्याला ओळखता आले नाही, अशा शब्दांत व्ही. बी. पाटील यांनी मंडलिक यांना टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार अडचणीत असताना छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःहून निवडणुकीला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराज कोणीतरी सांगितल्यामुळे निवडणूक लढवतील एवढे ते अपरिपक्व नाहीत. आपण विचार करायला हवा.

पवारसाहेबांच्या मनात असे काही असते तर त्यांनी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेबांच्या नावाने देणाऱ्या पुरस्काराच्या वेळी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली नसती. त्यावेळेस तो विषय संपला होता. हे कळाले नाही याचे आश्चर्य वाटते, असेही पाटील या वेळी म्हणाले. (Kolhapur Loksabha Election 2024 BJP Conspiracy Not Recognized V B Patil on Sanjay Mandlik NCP BJP)

छत्रपती शाहू महाराज Shahu Chhatrapati Maharaj आणि मंडलिकसाहेब यांचे व्यक्तिगत संबंध सर्वश्रुत आहेत. दोघांनीही एकमेकांवर अगदी मनापासून नुसतेच प्रेम केले नाही तर फॅमिली रिलेशनपण निर्माण केले. मंडलिकसाहेबांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात स्वतः जातीने उपस्थित राहणारे छत्रपती शाहू महाराज आम्ही पाहिलेत अनुभवले आहेत.

आजही मंडलिक घराण्याविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर आहे. याचाही अनुभव आपणास वेळोवेळी आलेला आहे. असे असताना असे विधान करणे योग्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. Shrimant Shahu Chhatrapati Maharaj Marathi News Updates

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT